नवी दिल्ली, दि. १५ जून २०२० : गेल्या २४ तासात कोविड-१९ चे ७,४१९ रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-१९ चे आत्तापर्यंत एकूण १,७९,७९७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ५१.०८ % पर्यंत वाढला आहे; यावरून ही वस्तुस्थिती निदर्शनास येते कि कोविड-१९ च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या १,५३,१०६ सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या ६५३ पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या २४८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण ९०१ प्रयोगशाळा). त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
• जलद आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा : ५३४ (सरकारी: ३४७ + खाजगी: १८७)
• ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : २९६ (सरकारी: २७१ + खाजगी: १५)
• सीबीएनएएटी(CBNAAT) आधारित चाचणी प्रयोगशाळा : ७१ (सरकारी: २५ + खाजगी: ४६)
गेल्या २४ तासांत १,१५,५१९ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ५७,७४,१३३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: