मुंबई, २६ जून २०२० : कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थिती मध्ये कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न चालू आहेत. परंतु, दिवसेंदिवस कोरोना बाधीत रूग्णांची संख्या मात्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणू वर मात करून रूग्ण बरे होत अाहेत, तसेच ज्या रूग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांचा मृत्यू देखील होत आहे. मागील दिवसांमध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झालेली होती . कोरोनाची लागण झालेले ते तिसरे मंत्री होते . समाजासाठी कार्य करत असताना त्यांना देखील या रोगाचा संसर्ग झाला, अखेर त्यांनी कोरोना वर यशस्वीपणे मात केली आणि बरे होऊन घरी परत आले.
कोरोना वर मात केल्यानंतर मा. ना. धनंजय मुंडे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला मात्र त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारी कडे लक्ष देत त्यांनी घरी बसूनच काम हाती घेतले. त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरून त्यांनी घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मंत्रीमंडळ बैठकीत सहभागी झाल्याचे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: