बारामती : ३० जून : देशातील डिझेल व पेट्रोलचे दर काही दिवसात गगनाला भिडल्याने सोमवारी (ता.३० जून) रोजी बारामती शहर, तालुका काँग्रेस पक्ष आणि त्याच सोबत बारामती शहर व तालुका युवक काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांना भावाढीच्या व मोदी सरकारच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
१० जून पासून १९ दिवस रोज होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे दळणवळणाचे दर वाढल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दर वाढला आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे अनेक लोकांना रोजगाराचा प्रश्न सतावत आहे. त्यात या दर वाढीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देखील केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरले असल्याची तक्रार आज काँग्रेस पक्षा कडून तहसीलदार यांना करण्यात आली. तसेच मोदी सरकारचे निषेध करणारे निवेदन देण्यात आले. या वेळी तालुका अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, शहर अध्यक्ष अँड. अशोक इंगुले, प्रांतिक प्रतिनिधी अँड.आकाश मोरे, तालुका युवक अध्यक्ष वैभव बुरुंगले,जिल्हा युवक सरचिटणीस विरधवल गाडे, शहर उपाध्यक्ष सुरज भोसले, शहर सरचिटणीस भरत रामचंद्रे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब देवकाते, शंकर राव झारगड इ. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
न्यूज अनकट प्रतिनिधी;अमोल यादव