महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन

सोलापूर, दि. ४ जुलै २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील ९८४ सार्वजनिक ग्रंथालय बंद आहेत. त्यामुळे जो वाचक वर्ग आहे त्यांना वाचनासाठी दैनिके , मासिके , पुस्तके देऊ शकत नाही. जिल्ह्यामध्ये सध्या लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे परिवहन सेवा व वृत्तपत्र पुरवठा वाहन सेवा सुरू झाल्याने वृत्तपत्र समूहाकडून वृत्तपत्र वितरण व्यवस्था सुरू झालेली आहे.

म्हणून ज्या ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या भागांमध्ये सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय समितीच्यावतीने तहसीलदार माढा यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

तसेच ग्रंथालय कायदा १९६७ प्रमाणे शासन मान्य ग्रंथालयांना शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे प्रथम संस्थेला खर्च करावा लागतो मग पुढील आर्थिक वर्षात मागील केलेला खर्च अनुदान म्हणून दोन टप्प्यात मिळतो परंतू शासनाने मार्च २०२० अखेर ४४% अनुदान वितरित केलेले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत ९८४ ग्रंथालयांमध्ये काम करणारे १९७६ यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित ६६% अनुदान लवकरातलवकर वितरित करावे. अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर रवींद्र परबत, ग्रंथमित्र कांतीलाल साळूंके, किशोर सलगर, दिनकर साळुंके, शहाजी भुसार, तुकाराम भाकरे ,छाया आखाडे ,सोमनाथ बचुटे, विलास खैरे, तानाजी सलगर, तानाजी गाडे, अमर परबत आदींच्या सह्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा