मुंबई, दि. ९ जुलै २०२०: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला सारथी संस्थेचा प्रश्न अखेर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मार्गी लागला असून राज्य सरकारकडून सारथी संस्थेला उद्याच ८ कोटी रुपये देण्यात येतील,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या बैठकीच्या सुरुवातीलाच आसन व्यवस्थेवरून गोंधळ सुरू झाला.
व्यासपीठावर अजित पवार, विजय वडेट्टीवार व नवाब मलिक हे बसले होते. तर, संभाजीराजे हे तिसऱ्या रांगेत बसले होते. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी गोंधळ घातला.
या सर्व गोंधळानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले कि, मान – अपमानाच्या पलीकडे आमचे जीवन आहे. आम्हाला एवढंच माहित आहे कि, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. छत्रपती हे सेवक आहेत. चांगल्या गोष्टीसाठी एकत्र यावं. ज्या उद्देशासाठी आलो तो पूर्ण होणे गरजेचे आहे. पुढील काही वर्षात सारथी स्वतःच्या पायावर उभी राहणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.