मुंबई, १६ जुलै २०२० : गुरुवारी दुपारी मुंबईच्या फोर्ट भागातील एका पाच मजली निवासी बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आसून दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे ही सांगितले जात आहे.
ही घटना सायंकाळी ४.४३ च्या सुमारास लकी हाऊस जवळील भानुशाली इमारतीत घडली. अग्निशमन दल आणि एक बचाव व्हॅन घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. आदल्या दिवशीच मुंबईतील मालाड भागातील अब्दुल हमीद मार्गावर एक चाळ कोसळली होती.
बुधवारी रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळी ८:३० पर्यंत सुरू असणाऱ्या मध्यम ते जोरदार झालेल्या रात्रीच्या सरींनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहराचे पावसाचे प्रमाण १०२४ मिलिमीटर (मि.मी.) पर्यंत गेले जे मासिक सरासरीच्या १२२% आहे. २०१५ पासून शहरात दुसर्या आठवड्यातील सर्वाधिक २४ तासांच्या पावसाची नोंद झाली आहे. शहरातील अनेक भागांतून पाणी साचल्याची बातमी समोर आली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसह शहराच्या विविध भागांतून धीम्या गतीच्या वाहतुकीची नोंद झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी