राजस्थान, दि. २६ जुलै २०२०: गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकारण चरण सीमेवर पोहोचले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये राजकीय वाद सुरु आहेत. विशेष म्हणजे आमदारांचा घोडे बाजार आवरून केलेल्या आरोपानंतर राजस्थान मध्ये हा राजकीय वाद चांगलाच उफाळला होता. अजूनही हा वाद सुरूच आहे. यादरम्यान हा वाद कोर्टासह राजभवन पर्यंत देखील पोहोचला. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल आपले काम नीट करणाऱ्या सहा आरोप देखील केला होता. आता राज्यपाल कलराज मिश्र हे केंद्रातील मास्तरांकडूनच आलेले प्रश्न विचारत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते अभिषेक मनू संघवी यांनी राज्यपालांवर असा आरोप केला आहे. राज्यपालांवर आरोप करत ते म्हणाले की, “राज्यपाल अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. तसेच करोना संकटादरम्यान कोणत्या राज्याची विधानसभा सुरू आहे असा सवालही त्यांनी केला होता. देशात अनेक राज्यांच्या विधानसभांचे कामकाज सुरू आहे. यामध्ये पडुचेरी , महाराष्ट्र आणि बिहारचाही समावेश आहे. राज्यपालांनी याबाबत माहिती घ्यायला हवी,”
“राज्यपालांनी प्रश्न विचारले आणि ते सक्रिय आहेत हे चांगलेच आहे. परंतु आमदारांची उपस्थिती आणि त्यांच्या कामकाजाशी निगडीत प्रश्न हे त्यांच्या अधिकारक्षेत्राखाली येत नाहीत. हे प्रकरण संपूर्णत: विधानसभा अध्यक्ष किंवा सचिवालय अंतर्गत येतं,” असेही त्यांनी नमूद केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी