हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज इ.स १६७८ मध्ये दक्षिण दिग्विजय करुन महाराष्ट्रात परत येत असतानाचा आहे. कर्नाटकातील गदग प्रातांतील बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला होता. या गावात एक देसाई गढी (छोटा किल्ला कीवा प्रांत) होता. मावळ्यांनी ही गढी जिंकायची ठरवली. मावळे तयार होते. युद्ध सुरू झाले, एक छोटीशी गढी, मावळे लढत होते पण गढी काही मिळेना. दिवसामागून दिवस जात होते. मावळ्यांना तशी ही गढी फारशी अवघड नव्हती. आठवडा झाला, दोन आठवडे झाले जवळ जवळ एक महिना गेला अखेर मावळ्यांनी गढी जिंकली. महाराजांसमोर प्रश्न पडला एवढी छोटी गढी पण अखेर पर्यंत लढवली असे कोण असेल या गढीत, कोण असेल ज्यांनी एवढ्या शरतीनी लढवली असेल ही गढी. माहिती समोर आल्यावर समजले ती एक स्त्री होती नाव मल्लाबाई देसाई. महाराजांना कौतुक वाटले.
गढी ताब्यात आली, मल्लाबाईला कैद करण्यात आले. महाराजांनी गढीत प्रवेश केला. सिंहासनावर स्थानापन्न झाले. मल्लाबाईला समोर आणण्याचे आदेश देण्यात आले. तिला एक लहान मूल होते. तिच्या मनात तिच्या बाळाविषयी चिंता होती, ती घाबरलेली आणि गांगारूनर गेली होती. समोर महाराज होते, कैद किवा मरण या दोनच गोष्टी समोर दिसत होत्या तिला. एकाबाजूला तिच्या लहान बाळाची काळजी होती. ती महाराजांसमोर रडू लागली. गडगडू लागली, मला ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
महाराज ह ऐकून गहिवरले. तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली, बाळ आणले, महाराजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सर्व प्रसंग बघून आईचे काळीज धडधडत होते. काय करावं तिला समजत नव्हते, राजा माझ्या बाळाला मारणार हा विचार तिच्या डोक्यात होता.
तेवढयात महाराजांनी मल्लाबाईला सोडण्याची आज्ञा दिली. ती धावत राज्यांच्या पायावर पडली, माझ्या लेकराला मारू नका अशी विनवणी करू लागली, महाराजांच्या मनात असे काही नव्हते. या शत्रू राज्यातील स्त्री साठी शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले ते “ताई………….
ताई … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझे भाचे झाले. आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय काही तरी दिले पाहिजे ना,
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी.”
असे म्हणून महाराजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. घडत असलेला प्रकार तिला समजत नव्हता पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
महाराज मी तुम्हाला माझे शत्रू समजले पण तुम्ही भावा बहिणीच नात निर्माण करून माझा सन्मान केला. महाराज निघुन गेल्यानंतर मल्लाबाईने शिवरायांचे शिल्प त्या गढी वर उभारले.
धारवाडच्या उत्तरेस यादवाड हे छोट गावं आहे. या गावातील एका मंदिरात हे शिवाजी महाराजाचं काळा पाषानातील शिल्प आडवं ठेवण्यात आलं आहे. या शिल्पाची उंची तीन फूट आणि रुंदी अडीच फूट इतकी आहे. हे शिल्प दोन भागात विभागलेले आहे. यात गादीवर महाराज बसले आहेत, लहान मुल मांडीवर आहे, राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने महाराज बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. असा प्रसंग या शिल्पात कोरला आहे. आजही कर्नाटकातील बेलवडी गावात हे शिल्प पहायला मिळते.
महाराजांना सख्खी बहिण नव्हती पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी महाराजांना आपला भाऊ मानत होती.
किती बर होईल हे महाराज कळले तर, जात आणि धर्माच्या पलिकडले छत्रपती, स्त्रीला माता आणि बहिणी समान मानणारे छत्रपती. प्रत्येक शिवभक्ताला हे छत्रपती समजले तर कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
ईश्वर वाघमारे-पुणे