कर्नाटक सरकारच्या कृत्यावर,महाराष्ट्रात शिवप्रेमींची संतापाची लाट….

कर्नाटक ८ ऑगस्ट २०२० : कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याने कर्नाटकाच्या गावातील लोक हे संताप व्यक्त करत आहेत. तर या घटनेचा तीव्र प्रतिसाद महाराष्ट्रात देखील घडताना दिसत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील हि घटना आहे. मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. स्थानिक ग्रामपंचायतीने देखील याला परवानगी दिली होती. तरी कर्नाटक सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तामध्ये पुतळा हटवण्यात आला आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमधे निषेधार्थ कर्नाटक सरकारचा पुतळा जाळण्यात आला तसेच कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेने कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन देखील केले. ‘कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही’ अशा निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.

..तर कोल्हापुरात एकाही कानडी माणसाला राहू देणार नाही

तसेच महाराष्ट्रातील शिवप्रमेमींनी या प्रकरणाचा लवकर छडा नाही लावला तर मग कर्नाटकात घूसू असा इशारा दिला आहे. त्या बरोबरच कर्नाटक सरकारचे आणि शिवाजी महारांजाच्या या पुतळ्याचे काय असे वाकडे आहे? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा