डोंबिवली, १० ऑगस्ट २०२०: कल्याण – डोंबिवलीमध्ये लॉकडाउन असला तरी सुद्धा काही दुकाने ही सम विषम पद्धतीने सूरू आहेत. मात्र जी दुकाने सुरू आहेत ती दुकाने काही ठराविक काळासाठीच उघडली जाण्यास मुभा आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि इतर अन्य दुकानांचा समावेश आहे. त्यामुळे काही दिवसांपुर्वी व्यायामशाळा मालकांनी व्यायामशाळा उघडण्याची मागणी केली होती, तर आज डोंबिवलीमधील ज्वेलर्स असोसिएशनने संपूर्ण दुकाने उघडण्यासाठी आणि रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे .
डोंबिवली मधील ज्वेलर्स असोसिएशन, व्यापारी महासंघ आणि शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण दुकाने उघडण्यासाठी आणि रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली.
आता आर्थिक परिस्थिती आधीच बिकट झाली असून शासनाचे कर, नोकरदार वर्गाला पगार आणि दुकानदार यांना भाडे कसे देणार असा सवाल उपस्थित केला. जर परवानगी दिली तर आम्ही सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळू. त्यासोबतच दुकानांचे निर्जंतुकीकरण सुद्धा करू असेही सांगितले. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून आपण दुकाने उघडण्याबाबत विचार करू असे सांगितले .
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे