मुंबई: बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली विराजमान झाला आहे. त्याच अजून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही बीसीसीआयमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रतिनिधीने सांगितले.
गांगुली अध्यक्ष झाल्यापासून अनेक वेगवेगळ्या घटना घडण्याला वेग मिळू लागला आहे. त्यातच गांगुली याने राहुल द्रविड याची भेट घेतली होती. त्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचा चांगले खेळाडू घडवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर यालाही मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खेळाडूंना चांगले मार्गदर्शन आणि एक यशस्वी व्यक्ती घडवण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्या मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. त्याच्यावर कुठली जबाबदारी दिली जाते हे पाहणे आता औसुक्याचे ठरणार आहे.