बॅडमिंटनच्या थॉमस व उबेर कप स्पर्धा पुढे ढकलल्या

डेन्मार्क, १५ सप्टेंबर २०२०: जागतिक बॅडमिंटन  महासंघाने थॉमस आणि उबेर कप स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. डेन्मार्क मधील आरहूस येथे ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार होती. आता या स्पर्धा २०२१ मध्ये होणार आहेत.

बॅडमिंटन डेन्मार्कशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असे जागतिक महासंघाने म्हटले आहे. बऱ्याच संघांनी या दोन्ही स्पर्धांतून माघार घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धा होतात मात्र इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, थायलंडसारख्या आघाडीच्या संघांनी माघार घेतली होती.

बॅडमिंटन पुन्हा सुरु व्हावे म्हणून जागतिक महासंघ व बॅडमिंटन डेनमार्क बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी बायो बबलची सुद्धा त्यांची तयारी होती. मात्र जगभरात कोविड १९  संदर्भातील अलीकडच्या घडामोडींनी अनेक खेळाडू व संघ सहभागास तयार नव्हते. त्यांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतला गेला आहे.

दरम्यान, ओडेन्स येथे होणारी डेन्मार्क ओपन स्पर्धा नियोजनानुसारच १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. मात्र २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान होणारी डेन्मार्क मास्टर्स २०२० स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा