पुरंदर, दि.३० ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे एक गाव एक गणपती उपक्रमाअंतर्गत एकता प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळामधील पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, पत्रकार आदी कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व गणपती फ्रेम देऊन सन्मान करुन आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी वाल्हे येथील गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबन्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वाल्हे येथील सर्व गणेशोत्स्व मंडळांनी वाल्हे पोलिस औटपोस्टच्या प्रांगणामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. आज मुख्य बाजारपेठमधील एकता प्रतिष्ठानच्या वतीने आरती करण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने, सरपंच अमोल खवले, वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, वाल्हे पोलिस औट पोस्टचे हनुमंत गार्डी, भानुदास जगदाळे, समीर हिरगुडे, पत्रकार आदिंचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संदिप कारंडे, नरेंद्र ढवळे, सचिन लंबाते, तेजस पवार, सागर शहा, सागर भुजबळ, तानाजी भुजबळ आदिंसह एकता प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रशांत पवार यांनी प्रास्ताविक केले. दिपक कुमठेकर यांनी सुत्रसंचालन तर परेश काळंगे व ओंकार ढवळे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी न्यूज अनकट: राहुल शिंदे