डोके खाजण्यापासून मिळवा मुक्ती….

35

काही लोकांना सतत डोकं खाजवण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचा हात सतत डोक्यात असतो. जे पाहणाऱ्याला विचित्र वाटू शकतं. या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर काही उपाय करुन पाहू यात….
उपाय क्र.१:
केळी आणि मध कालवून त्याचा लेप डोक्याला लावावा. तो डोक्यावर थोडा वेळ लावून डोके शांपूने धुवून टाकावे. त्यावर मध लावले तरी चालते.

तसेच खोबरेल तेल गरम करून डोक्याला लावण्याने सुद्धा हि समस्या कमी होऊ शकते. अशा प्रकारच्या गरम तेलाचा उपाय करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरावे. हे तेल गरम करावे आणि गरम असतानाच डोक्याला चोळावे. ते लावताना त्यात मधाचा एक थेंब टाकावा आणि या तेलाने हळू हळू मसाज करावी व त्यानंतर केस धुवून टाकावे.

या प्रक्रियेत लिंबू वापरून सुद्धा असा लेप तयार करता येतो. लिंबाचा रस डोक्याला लावला जातो. ऍलोवेरा म्हणजे कोरफड हे सुद्धा केसाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरते.