आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी १३० कोटी भारतीयांची महत्वाकांक्षा अजून ही बुलंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२० : पंतप्रधान शिखर परिषद , आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या एकाच ध्येयानं १३० कोटी भारतीय प्रेरित झाले असून कोविड १९ च्या संकटानंतरही त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा अद्याप बुलंद असल्याचं प्रेरणादायी प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी मंचाच्या तिसऱ्या नेतृत्व परिषदेत काल मोदी यांचं हे भाषण झालं. त्यामध्ये त्यांनी हे प्रतिपादन केलं. आत्मनिर्भर भारत संकल्पना ही भारताचं दुय्यम बाजारपेठेतून जागतिक मूल्य साखळीच्या केंद्रस्थानी असलेल्या सक्रीय उत्पादन केंद्रात रुपांतर करण्याची प्रक्रिया असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. जागतिक कल्याण हेचं आपलं उद्दिष्ट असल्याचं भारतानं वेळोवेळी दाखवून दिलं आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे वेगळा विचार करताना मानव केंद्रित विकासाचा दृष्टीकोन बाळगणं आवश्यक आहे. जागतिक पुरवठा साखळीचा विकास आर्थिक मूल्याच्या नव्हे, तर विश्वासाच्या आधारावर करायला हवा, हे जागतिक स्तरावर घटक ठरलेल्या महामारीच्या संकटानं दाखवून दिलं, असही मोदी म्हणाले.

भारतात सार्वजनिक तसंच खासगी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी असून देशात आता कोळसा, खाणकाम, संरक्षण, रेल्वे, अवकाश आणि अणुउर्जा ही क्षेत्रही खुली केली असल्याचं ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा