पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना होणार अटक..! अजामीनपात्र वॉरंट जारी

इस्लामाबाद, ४ सप्टेंबर २०२०: पाकिस्तानच्या एका कोर्टाने गुरुवारी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने ३४ वर्ष जुन्या जमीन वाटप प्रकरणात वॉरंट जारी केले आहेत. सुनावणीदरम्यान मॉडेल टाऊनचे पोलिस निरीक्षक बशीर अहमद यांनी लाहोर कोर्टाचे न्यायाधीश असद अली यांना सांगितले की नवाज शरीफ त्यांच्या निवासस्थानावर नाहीत.

कोर्टाने गेल्या महिन्यात अटकपूर्व वॉरंट जारी केले आणि नवाज शरीफ यांचे सर्व ज्ञात पत्त्यांवर समन्स बजावले आहे. शरीफ यांच्यावर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. एक्स्प्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) नेते अता तारार यांनी नवाज शरीफ हे सहा महिने परदेशात असल्याची पुष्टी न्यायालयासमोर केली.

यावर राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरोच्या (एनएबी) वतीने विशेष वकील हॅरिस कुरेशी यांनी नवाज शरीफ यांच्याविरूद्ध अजामीनपात्र अटक (एनबीए) वॉरंट जारी करण्यास सांगितले. कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावत लंडनमधील पाकिस्तान उच्चायोगामार्फत हे अटक करण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाला दिले.

दोन दिवसांपूर्वी कोर्टाने नवाज शरीफ यांना शरण जाण्याची शेवटची संधी दिली. भ्रष्टाचारप्रकरणी नवाज शरीफ दोषी ठरले आहेत, परंतु ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून लंडनमध्ये आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या कोर्टाने मंगळवारी नवाज शरीफ यांना सांगितले की, शरण जाण्यासाठी त्यांच्याकडे १० सप्टेंबरपर्यंत वेळ आहे.

लाहोर हायकोर्टाने नवाझ शरीफ यांना चार आठवड्यांसाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली, जेणेकरुन त्याचा उपचार होऊ शकेल. पण त्यानंतर ते परत आले नाही. ७०-वर्षीय नवाज शरीफ यांना अल-अजीजिया स्टील मिल प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा