मुंबई, ७ सप्टेंबर २०२०: कोरोनाच्या संकटामुळे जून महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन सरकारला दोन वेळा पुढे ढकलावे लागले. अजूनही कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. परंतु पुरवणी मागण्यांना विधिमंडळाची मंजुरी आवश्यक असल्याने ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
विधानपरिषद अपडेट:
१. उपसभापती पदाची निवडणूक जाहीर – उपसभापती पदाची निवडणूक जाहीर, सभापती रामराजे निंबाळकर यांची घोषणा, उद्या (मंगळवारी) होणार निवडणूक
२. विधेयक रेटणे हा चुकीचा पायंडा : फडणवीस – संख्याबळाच्या आधारे विधेयक रेटणे चुकीचं, हा चुकीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही, ग्राम पंचायत प्रशासक नेमण्याच्या विधेयकावर देवेंद्र फडणवीसांचा जोरदार आक्षेप. कोर्टात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, कोर्टाच्या विरोधात सरकार भूमिका घेत आहे, कोर्टानं जो निर्णय दिलाय त्यानुसार नियुक्ती करा, फडणवीसांची मागणी
३. बिल वेगळं, विरोधीपक्षांनी गल्लत करु नये : अजित पवार – बिल वेगळं आहे, कोर्टात निकाल लागला तर तो पाळला जाईल, विरोधी पक्षांनी याची गल्लत करु नये
४. मुश्रीफांना प्रशासक नेमण्याची घाई : फडणवीस – मुश्रीफांना ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याची घाई, पण नियमबाह्य होऊ देणार नाही.
५. GST सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर- अजित पवार यांनी GST सुधारणा विधेयक मांडले, आवाजी मतदानाने विधेयक मंजूर
६. मराठवाड्यातील भाजप आमदारांची अधिवेशनापूर्वी घोषणाबाजी- वैद्यकीय क्षेत्रातील प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याची मागणी, मराठवाड्यातील भाजप आमदारांची अधिवेशनापूर्वी घोषणाबाजी ७०:३० टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे