पुणे, १४ सप्टेंबर २०२०: आज राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सहाय्यता कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
पुणे शहरामध्ये वाढत्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सूचनेनुसार तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे ,खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी नागरिकांना कोविड संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एनसीपी कोविड ब्रिगेडच्या वतीने पुणे सिटी सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत या सहाय्यक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सिंहगड रोड वाहतूक पोलीस चौकी येथे हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. “आपल्या भागातील ज्या नागरिकांना कोविड संदर्भातील काही अडचण किंवा प्रश्न असतील त्यांनी कृपया साहित्य कक्षाला भेट द्यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहे.”, असे सोपान उर्फ काका चव्हाण, अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगितले.
पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी नागरिकांच्या सोयीसाठी थर्मामीटर सुपूर्त केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: