होमिओपॅथीसाठी काल लोकसभेत दोन विधेयकं मंजूर

12

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२० : होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोग आणि भारतीय वैद्यक व्यवस्था राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याबाबत दोन विधेयकं काल लोकसभेत मंजूर करण्यात आली. होमिओपॅथी तसंच भारतीय उपचार पद्धतीत उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत हा यामागचा उद्देश आहे.

राज्यसभेत १९ मार्च रोजी ही विधेयके मंजूर झाली आहेत. तत्पूर्वी कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. लोकसभेत कृषी क्षेत्रासाठी तीन विधेयकं सादर करण्यात आली. यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी तसेच खासगी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा मोबदला मिळण्यास मदत होईल.

जवळपास ८६ टक्के शेतकऱ्यांची शेती दोन हेक्टरपेक्षा कमी असल्यानं त्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ घेता येत नाही असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी यावेळी सांगितलं. विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

लोकसभेमध्ये अनेक विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याबद्दल घोषणाबाजी सुरु केल्यावर ते बोलत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी