अँड.स्नेहा भापकर यांची कायदादूत जिल्हाध्यक्षपदी निवड

बारामती ३ ऑक्टोंबर २०२०: समाजातील मुलींवर, महिलांवरील अन्याय, अत्याचार होवू नये, याबाबत जागरूकता निर्माण करणे ,पिडीत, अन्याय झालेल्या अत्याचारीत महिलांना ख-या अर्थाने न्याय मिळेपर्यंत आपुलकीचा आणि हक्काचा आधार आवश्यक आहे.यासाठी काम करणार असल्याचे भापकर यांनी निवड झाल्यावर सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांच्या न्याय व हक्कांसाठी ‘कायदादुत’ ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात कायदादूत ही संकल्पना अस्तित्वात आणावयाची असुन नुकतीच ‘पश्चिम महाराष्ट्राची’ कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.यामध्ये ‘पुणे जिल्हयाच्या कायदादुत म्हणुन अँड.स्नेहा भापकर’ यांची निवड करण्यात आली.यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, कायदादुतचे मार्गदर्शक अँड. औदुंबर खुणे पाटील, अध्यक्षा अ‍ॅड.जयश्री पालवे, नवनियुक्त महिला वकील व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचा उपयोग महिला व मुलींवर होणा-या अन्याय अत्याचाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच महिलांच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.असे अँड. स्नेहा भापकर यांनी निवडी नंतर व्यक्त केले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा