बारामती, ८ ऑक्टोबर २०२०: बारामती शहरात सध्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून पैसे उकळण्याचे खोटे धंदे सुरू आहेत. व्यापारी बदनामीला घाबरून बळी पडत असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. जर कोणाबरोबर असा प्रकार घडल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, पोलीस कर्मचारी आता साध्या वेशात सापळा रचुन अशा आरोपींना ताब्यात घेणार आहे. असे आवाहन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनकडुन बारामतीमध्ये होणाऱ्या काही गैर प्रकाराबद्दल सावधानी बागळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये बारामतीमध्ये काही जोडपी टोळी सक्रिय आहे. हे जोडपी दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने येतात त्यांना पोषक वातावरणात झाल्यावर दुकांदाराने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल वाद घालतात.आणि महिला साथीदाराला वाईट नजरेने बघितले, गैरवर्तन केले असे आरोप करत गोंधळ घालतात. या अनपेक्षित झालेल्या प्रकाराने गोंधळून दुकानदाराला पोलीसात तक्रार करेन असे धमकावून पैसे उकळतात व त्याच्या मागण्यांना बळी पडत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत.
सर्व दुकानदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि असे काही प्रसंग घडल्यास पोलीस स्टेशनला फोन करून माहिती द्यावी. त्याच प्रमाणे शहरात परप्रांतीय २०- २२ वर्षांच्या महिला हातात तान्हे बाळ घेऊन गर्दी असलेल्या दुकानात शिरतात तर बाहेर तिच्या साथीदार हातात काही तरी विक्रीला आणले आहे असे दाखवत आसपास लक्ष ठेऊन उभ्या असतात. तर दुकानात गेलेली महिला ही किरकोळ खरेदी करून मग पैसे कमी दिले म्ह्णून सुट्या पैशावरून दुकांनदाराशी वाद घालवून त्यानाच्या कडुन जास्तीचे पैसे उकळतात आणि पैसे हातात पडताच दुकांनदाराच्या लक्षात येई पर्यंत सीसीटीव्ही चेक करेपर्यंत त्या महिला गायब होतात. त्या बाहेरगावाहून आल्या असल्याने त्यांना ओळखणे अवघड जाते आहे. तसेच काही तृतीयपंथी दुकानदारांना अडवणूक करून पैसे उकळतात, तर एखादे नवीन दुकान सुरू झाले असेल तर तिथे अडवणूक करून पैसे घेतात.
अनेक वेळा बाजारच्या दिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशात हात घालून पैसे काढतात मात्र घाबरून या प्रकरणी कोणी पुढे येत नाही. मात्र नागरिकांनी असे प्रकार घडल्यास बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.
तक्ररीसाठी संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे:
बारामती पोलीस स्टेशन – 100 / 224333
औदुंबर पाटील साहेब – 9967425298
न्यूज अनकट प्रतिनिधी