पूर्व भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयिकाराचा झटका, दिल्लीतील रुग्णालयात करण्यात आले दाखल

नवी दिल्ली: २३ ऑक्टोबर,२०२० भारतीय क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, कपिल देव यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

कपिल देव रुग्णालयात असल्याची माहिती सोशल मीडिया वर आल्यावर त्यांच्या चाहत्यांकडून लवकर बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.कपिल देव यांचे नाव भारतीय क्रिकेट मध्ये सर्वोच्च स्थानी आहे. कपिल देव यांनी १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाला पहिला विश्व चषक जिंकवून दिला होता. तसेच त्यांचे नाव हे विश्वातील सर्वोच्च ऑल राऊंडर्स मध्ये घेतले जाते.

कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत १३१ कसोटी सामने आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहे. त्यांच्या नावे कसोटी सामन्यात ५२४८धावा आणि ४३४ विकेट्स आहेत. तसेच एकदिवसीय सामन्यात ३७८३ धावा आणि २५३ विकेट्स आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा