नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर २०२०: लडाखमधील सतत घसरणाऱ्या तापमानादरम्यान, आता असं दिसते आहे की लष्करी स्तरावरील चर्चा योग्य दिशेनं वाटचाल करत असताना भारत आणि चीन वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) सैन्य मागं घेण्याच्या परस्पर कराराकडं येत आहेत. हा तणाव सामान्य करण्यासाठी आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये कोर कमांडर स्तरावरील ८ फेऱ्या झाल्या आहेत.
सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, जर अशाच प्रकारे चर्चांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू राहिले तर येणार्या काळात वादग्रस्त भागातून दोन्ही देशांची सैन्य माघार घेण्यास सहमती होऊ शकेल.
सूत्रांनी सांगितलं की, मात्र भारत याबाबतीत सावधगिरीनं कार्य करीत आहे, कारण दोन्ही वाटाघाटी आणि करार या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात रुपांतर व्हाव्यात आणि त्या जमिनीवर राबवाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. चर्चांमध्ये टँक आणि सशस्त्र वाहनं त्यांच्या सध्याच्या स्थानांवरून मागं हलविण्याबाबत देखील निर्णय होत आहेत आणि पुढील काही दिवसांत या संदर्भात प्रगती होण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, आठव्या फेरीच्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी वादग्रस्त विषयांवर कारवाई करण्यापूर्वी आणखी काही मुद्द्यांवर चर्चा करावी लागंल. रविवारी भारत आणि चीन यांच्यात कॉर्प कमांडर स्तरावरील बैठकीच्या आठव्या फेरीनंतर दोन्ही बाजूंनी संयुक्त निवेदन जारी केलं.
निवेदनात म्हटलं आहे की, भारत-चीन सीमाभागातील पश्चिम भागात वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) सैन्य मागं घेण्याबाबत दोन्ही बाजूंनी स्पष्ट, सखोल आणि विधायक संवाद झाला. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेल्या महत्त्वपूर्ण सहमतीची अंमलबजावणी करण्यास आणि त्यांच्या सीमेवर तैनात असलेल्या सैन्यदलावर संयम दाखवण्याचे काम करण्याचे आणि गैरसमज टाळण्याचे काम करण्याचेही दोन्ही बाजूंनी मान्य केलं.
त्याचबरोबर सैन्य व मुत्सद्दी पातळीवरही संवाद व चर्चा कायम ठेवण्यास त्यांनी सहमती दर्शविली. बैठकीत संवाद सुरू ठेवत सीमावर्ती भागात एकत्रितपणे शांतता प्रस्थापित करता यावी यासाठी इतर ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर देण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे