मुंबई : भारताची गान कोकिळा आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना सोमवारी मध्यरात्री दीड वाजता ब्रीच कॅन्डी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले होते. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहितीत त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. रुग्णालयात यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या बहिणी आणि भाऊ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या महिती नुसार जर त्यांची तब्येतीत सुधारणा झाली तर आजच त्यांना घरी सोडण्यात येईल.
लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबर रोजी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला.
तब्बल एक हजार गाण्यांना त्यांनी आवाज दिला असून त्यांना “भारतरत्न “पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.