मावळातील प्रेक्षणीय स्थळांची संवर्धनासाठी विकास आराखडा बाबत बैठक संपन्न

पुणे, २० जानेवारी २०२१: महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी-आगरी बांधवांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी गडाचे व परिसरातील ऐतिहासिक लेण्यांचे जतन, संवर्धन करण्यासह विकास आराखडा तयार करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी बैठक संपन्न झाली.

मावळ तालुक्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळावी व त्यातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गडावर येणाऱ्या भाविकांना पायाभूत व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यामध्ये भक्तनिवास, लिफ्ट, दर्शनरांगेचे नियोजन, सुशोभित गार्डन, हेलिपॅड, इतर दुकाने, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह इ. सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. आई एकविरा देवी गड व परिसरातील लेण्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. यावेळी एकविरादेवी मंदिर व लेणी विकासकामांसह पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी मुलभूत सोयीसुविधांचा समावेश या विकास आराखड्यात करावा अशी मावळच्या जनतेच्या वतीने आमदार सुनील शेळके मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी केली.

या बैठकीस पर्यटन मंत्री मा.आदित्यजी ठाकरे, राज्यमंत्री आदितीताई तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, एमटीडीसी संचालक श्री सावलकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आर्किटेक्ट शब्बीर उनवाला व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा