बारामती( दि.२५ )प्रतिनिधी : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडियमवर प्रथमच वुमेन्स प्रिमिअर लिग टि-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती व परीसरातील महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उपक्रम राबवत आहे. बारामतीतील धीरज जाधव क्रिडा ॲकॅडमी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलींना प्रोत्साहीत करतील अशी माहिती डी जे क्रिकेट ॲकॅडमीचे प्रमुख धीरज जाधव यांनी दिली.
गुरुवार २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान महिलांच्या क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहेत.यामध्ये साखळी व बाद फेरी पार पडणार आहे.स्पर्धेचे उदघाटन गुरुवार (दि.२८) रोजी आमदार रोहित पवार आणि सुनंदा पवार यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता होणार आहे. स्पर्धेत नामवंत भारतीय आंतरराष्ट्रीय तसेच रणजी महिला खेळाडूंचा समावेश आहे.या स्पर्धेत अनुजा पाटील, मोना मेशराम, सारिका कोळी, पूनम यादव यासारखे आंतरराष्ट्रीय तसेच स्मृती मंधाना, पूनम खेमनार, पूनम पराटे, तेजल हसबनीस असे महिला खेळाडू प्रथमच बारामतीत आपला खेळ दाखवणार आहेत.क्रिकेटच्या स्पर्धा पाहण्यासाठी बारामतीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन धीरज जाधव यांनी केले आहे.स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघास ५३ हजार आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघास ३३ हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
न्युज अन कट प्रतिनिधी – अमोल यादव