चमोलीतील शीलासमुद्र ग्लेशियरच्या खाली तडा, भविष्यात धोकादायक

चमोली, ९ फेब्रुवरी २०२१: उत्तराखंड मध्ये असे अनेक ग्लेशियर म्हणजेच हिमकडे आहेत जे कधीही धोकादायक ठरू शकतात. असेच एक ग्लेशियर चमोली जिल्ह्यातील माउंट त्रिशूल आणि माउंट नंदाघुंटी च्या खाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे ते वितळत आहे. परंतु कोणत्याही वेळी हे आपत्ती आणू शकते. असे सांगितले जात आहे की, या ग्लेशियर च्या खाली तयार झालेल्या दोन भेगा केव्हाही आपत्ती आणू शकतात. या भेगा निसर्गतः तयार झाल्या आहेत.

या ग्लेशियर चे नाव आहे शीलासमुद्र. या भागातील जाणकारांचे असे म्हणणे आहे की, जर एखादा भूकंप या भागात झाला तर शीलासमुद्र ग्लेशियर कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या ग्लेशियर चा प्रभाव अडीचशे किलोमीटर दूर असलेल्या हरिद्वार पर्यंत पाहण्यास मिळू शकतो. या ग्लेशियर शी संबंधित आपत्ती विषयी प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सध्या चालू आहेत.

लोक शिलासमुद्र ग्लेशियरवर ट्रेकिंगसाठी जातात. हा रूपकुंड-जुनारगाली-होमकुंड ट्रेक या मार्गावर येतो. याच्या एका बाजूला रोंटी सॅडल आहे, तर दुसर्‍या बाजूला दोडांगची दरी आहे. या खोऱ्यात शिलासमुद्र ग्लेशियर चा खालचा आणि खडकाळ भाग आहे.

शिलासमुद्र ग्लेशियर चा बर्फाच्छादित आणि वरचा भाग नंदाघंटीपासून निघतो. या ठिकाणी राजाजात नावाची धार्मिक यात्रा देखील होते. हा ग्लेशियर सुमारे ९ किमीच्या क्षेत्रात पसरलेला आहे. समस्या अशी आहे की या ग्लेशियर च्या पायथ्याशी आता दोन नैसर्गिक छेद तयार झाले आहेत. सन २००० मध्ये ही भेग खूपच लहान होती, परंतु २०१४ पर्यंत ती खुप मोठी झाली आहे.

आता या दोन्ही भेगांभवती मोठ्या प्रमाणात तडे आहेत. या भेगांना भविष्यासाठी धोकादायक मानले जात आहे. हिमालयातील पर्वतीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उच्च हिमालयीन प्रदेशात हलका भूभाग ग्लेशियर साठी धोकादायक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा