माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे कोविड लसीकरणास सुरुवात

माढा, १२ फेब्रुवरी २०२१ : टेंभुर्णी ता माढा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सकाळी कोविड-१९ च्या प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ करण्यात आला असून आज आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका अशा दोनशे जणांना मोफत लसीकरण करण्यात आले.

सरपंच प्रमोद कुटे व सपोनि अमित शितोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ता. वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात, वैभव कुटे,उपसरपंच धनंजय गोंदिल, वैद्यकीय अधिकारी नंदकुमार घोळवे, डॉ.विक्रांत रेळेकर, डॉ. नितीन देशपांडे, डॉ.यशवंत सातपुते, रामभाऊ शिंदे, गणेश केचे, अमोल धोत्रे, सोमनाथ साळुंखे, शैलेश ओहोळ, नारायण गायकवाड, डॉ. प्रणिता खोटे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.विक्रांत रेळेकर यांनी कोणताही आजार असलातरी ही लस घ्यायला हवी, ती सुरक्षित आहे असे सांगितले. तर सरपंच प्रमोद कुटे यांनी कोरोना काळात कोविड संसर्गापासून आरोग्य कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण केले याबद्दल सर्वांचे आभार मानले. सपोनि अमित शितोळे यांनी शासन आपल्या आरोग्यासाठी प्रयत्न करीत आहे याचा लाभ घ्यावा असे अवाहन केले. आज दुपार पर्यंत १४० जणांनी लसीकरण करून घेतले होते. या लसीकरणासाठी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा