बीजापुर, ९ एप्रिल २०२१: बीजापुर येथे नक्षलवाद्यांनी ७ दिवसांपूर्वी ओलीस पळवून नेलेल्या कोब्रा जवान राकेश्वरसिंग मनहासला सोडले आहे. सीआरपीएफने जवान त्यांच्याकडे येण्याची पुष्टी केली आहे.
सरकारने तयार केली मध्यस्थी टीम
कोब्रा जवान राकेश्वरसिंग मनहास यांना मुक्त करण्यासाठी मध्यस्थीची टीम तयार केली गेली. पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाज अध्यक्षा तेलम बोरैया हे यात सहभागी होते. शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत राकेश्वरसिंग मनहासला सोडण्यात आले.
राकेश्वरसिंग मनहासच्या सुटकेनंतर त्यांना बासागुडा येथे नेण्यात येणार आहे. सीआरपीएफ डीजीने मनहास त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची पुष्टी केली आहे. टेकलागुडेम चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी कोब्रा २१० व्हीचा जवान राकेश्वरसिंग मनहास याला पळवून नेले. राकेश्वरसिंग मनहासवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यांना सीआरपीएफच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये कमकुवतपणा आणि डिहायड्रेशनचा नेहमीचा उपचार दिला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे