नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२१: कोरोना संक्रमणाविरूद्धच्या लढ्यात भारतासोबत ब्रिटन देखील सामील झालाय. ब्रिटननं अशी ६०० उपकरणं भारतात पाठविण्याची घोषणा केली आहे, ती कोरोनाविरूद्धच्या लढ्यात वापरली जाईल. कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने ब्रिटनची मदत मागितली होती, असं सांगण्यात येत आहे, त्यानंतर ब्रिटीश सरकारनं भारताला मदतीचा निर्णय घेतला. रविवारी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन केंद्राची पहिली खेपही युकेहून निघाली, जी मंगळवारपर्यंत दिल्लीला पोहोचू शकेल.
या आठवड्यात भारतात कोरोना संक्रमणाचे भयानक प्रकार दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ३ लाखाहून अधिक प्रकरणं नोंदविली जात आहेत. दोन हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडत आहेत. म्हणूनच भारतानं अनेक देशांची मदत घेतली होती. भारत सरकारशी चर्चा झाल्यानंतर यूकेनं रविवारी पहिलं जहाज पाठवलं आहे, जे मंगळवारी सकाळपर्यंत दिल्लीला पोहोचंल. यानंतर, या आठवड्यात अनेक लोकांचे जीव वाचवणारे उपकरणं यूकेमधून येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ९ कंटेनर भारतात येणार आहेत, ज्यात ४९५ ऑक्सिजन कंसेंट्रेटर्स, १२० नॉन-इन्वेसिव व्हेंटिलेटर आणि २० मॅन्युअल व्हेंटिलेटर आहेत. ही यंत्रणा बर्याच रूग्णांचे प्राण वाचविण्यात उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, ऑक्सिजन कंसेंट्रेटर्सच्या मदतीनं ऑक्सिजन स्वभावतालच्या हवे मधूनच काढून रुग्णांना दिला जाऊ शकतो. इस्पितळात ऑक्सिजनची कमतरता असल्यास त्यांचा चांगला वापर केला जाऊ शकतो.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, कोरोनाच्या या युद्धामध्ये ब्रिटन भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ते म्हणाले, “कोरोनाविरूद्धच्या लढ्यात आम्ही मित्र आणि भागीदार म्हणून भारताशी खांदा लावून उभे आहोत.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे