तामिळनाडू– महेंद्रगिरी, १६ जुलै २०२१: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) १४ जुलै २०२१ रोजी म्हणजेच गुरुवारी गगनयान मिशनमध्ये एक पाऊल पुढं टाकलं आहे. याने विकास इंजिन लाँग टर्म हॉट टेस्टची तिसरी यशस्वी चाचणी घेतली. हे इंजिन जीएसएलव्ही-एमके-३ (GSLV-MkIII) रॉकेटच्या लिक्विड स्टेज मध्ये स्थापित केलं जाईल. ही चाचणी इंजिनची कार्यक्षमता तपासण्यासाठी करण्यात आली, जी यशस्वीरीत्या झाली.
तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी) येथे विकास इंजिन २४० सेकंद चालविण्यात आलं. या चाचणीत, इंजिननं ठरवलेल्या मानकांनुसार काम केले. त्याने सर्व संभाव्य गणना पूर्ण केली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केलं. हे इंजिन रॉकेटच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये स्थापित केलं जाईल, जे गगनयान कॅप्सूल अंतराळात नेईल.
यावर्षी मार्च महिन्यात, भारतीय हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांनी रशियामध्ये गगनयानसाठी प्रशिक्षण पूर्ण केलं. राजधानी मॉस्को जवळ असलेल्या ग्योगेनी शहरात स्थित रशियन स्पेस ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांना एस्ट्रोनॉट्स होण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यांना गगननॉट्स (Gaganauts) म्हटलं जात आहे.
भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना गॅगरिग कॉसमोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण देण्यात आलंय. याची पुष्टी त्यावेळच्या रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी केली. ते म्हणाले होते की, रशियाला भारताबरोबर भविष्यातील मोहिम करण्याची इच्छा आहे. इस्रो आणि रशियाच्या ग्लवकॉस्मॉस (Glavcosmos) यांच्यात जून २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी गगननॉट्स (Gaganauts) बनविण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
एका ग्रुप कॅप्टनसह उर्वरित तीन विंग कमांडर असे भारतीय हवाई दलाचे चार वैमानिक आहेत, त्यांचं प्रशिक्षण गॅगरिन कॉसमोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये पूर्ण झालं आहे. या भारतीय जवानांचे प्रशिक्षण १० फेब्रुवारी २०२० पासून सुरू झाले परंतु कोरोनाव्हायरसमुळं ते काही दिवसांसाठी थांबविण्यात आलं. नंतर ते १२ मे रोजी सुरू करण्यात आलं. यापूर्वी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, रशियामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर या चार गगननॉट्स (Gaganauts) बंगळुरूमधील गगनयान मॉड्यूलमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे