यूएई, 3 ऑक्टोंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 47 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (आरआर) ने चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा 7 गडी राखून पराभव केला. अबू धाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर चेन्नईने 20 षटकांत 4 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थानने 17.3 षटकांत 3 विकेट गमावून 190 धावांचे लक्ष्य गाठले. शिवम दुबे 64 आणि ग्लेन फिलिप्स 14 धावांवर नाबाद राहिले.
राजस्थानचा हा सिजन मधील 5 वा विजय आहे. अशा प्रकारे, संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम आहे. 12 सामन्यांमध्ये संघाचे 10 गुण आहेत आणि ते 7 व्या स्थानावरून 6 व्या स्थानावर आहेत. सीएसकेची टीम आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.
यशस्वी जैस्वाल आणि लुईस यांनी संघाला झटपट सुरुवात दिली
190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने वेगाने सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 5.2 षटकांत 77 धावा जोडल्या. शाईदुल ठाकूरने लुईसला बाद केले. त्याने 12 चेंडूत 27 धावा केल्या. 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
पहिल्या 6 षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या एका विकेटसाठी 81 झाली. यशस्वीने 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 21 चेंडूत 50 धावा केल्यावर तो बाद झाला. त्याच्या टी -20 कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. वेगवान गोलंदाज केएम आसिफने त्याला बाद केले.
81 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर संजू सॅमसन (28) आणि शिवम दुबे (64 *) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 89 धावा जोडल्या आणि संघाचा विजय निश्चित केला. सॅमसनला शार्दुलने बाद केले. शिवमला दुसऱ्या लेगच्या सामन्यात पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने अर्धशतक झळकावून स्वतःला सिद्ध केले. त्याने 42 चेंडूंचा सामना केला. 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. ग्लेन फिलिप्सही 14 धावांवर नाबाद राहिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे