WhatsAppमध्ये येतंय हे रंजक फीचर, खूप दिवसांपासून होतं प्रतीक्षेत

10

पुणे, 14 जानेवारी 2022: WhatsAppने गेल्या काही काळापासून ऑडिओ मेसेजमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. काही फेसही आले आहेत, तर काही फीचर्समुळे यूजर्सनाही खूप फायदा झाला आहे. अलीकडेच WhatsAppच्या ऑडिओ मेसेजमध्ये प्लेबॅक स्पीड कंट्रोल करण्याचं फीचर आलं आहे. व्हिज्युअल बदल देखील केले आहेत. आता एक नवीन फीचर येत आहे जे खूप महत्वाचं होतं.

वास्तविक, WhatsAppचे ऑडिओ मेसेज ऐकण्यासाठी तुम्हाला चॅटमध्ये राहावं लागत होतं. नवीन फीचर आल्यानंतर तुम्ही ते व्हॉइस मेसेज चॅटमध्ये न राहता देखील ऐकू शकता. उदाहरणार्थ, चॅटमध्ये व्हॉइस मेसेज आला आहे आणि तो ऐकत असताना तुम्ही इतरांशी चॅट करू शकता. मल्टी-टास्किंगच्या बाबतीत हे खूप चांगलं सिद्ध होईल.

WhatsAppच्या फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetainfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ऑडिओ मेसेजसाठी मल्टी टास्किंग फीचर आणत आहे.

हे फीचर कसं कार्य करेल?

उदाहरणार्थ, XYZ नावाच्या व्यक्तीनं तुम्हाला WhatsApp वर व्हॉइस मेसेज पाठवला आहे. तुम्ही व्हॉइस मेसेज उघडून ऐकायला सुरुवात केली. आता तुम्हाला इतरांशी चॅटिंग करायची आहे किंवा ऐकताना WhatsApp स्टोरीज बघायच्या आहेत. अशावेळी तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. तुम्ही त्या चॅटमधून बाहेर पडताच, WhatsAppच्या टॉप वर एक ऑडिओ बार तयार होईल जिथून तुम्ही मॅनेज करू शकता. इथं पॉज करण्याचा पर्याय देखील असंल आणि इथूनच प्ले देखील करता येईल.

सध्या, हे फीचर प्रत्येकासाठी आलेलं नाही. सर्वप्रथम हे फीचर बीटा युजर्ससाठी येईल आणि नंतर कंपनी अपडेटद्वारे सर्वांसाठी हे फीचर जारी करू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे