अयोध्या आणि राज-कारण

मुंबई ११ मे २०२२ : सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकुणातच चर्चेत आहे. आधी भोंग्यामुळे नंतर आता अयोध्या दौऱ्यामुळे. राज ठाकरे यांचा होणारा अयोध्या दौरा गाजतोय. राज ठाकरे दौऱ्यावर जाणार हे ठरताच विविध स्तरांतून विरोध होतोय. आधी उत्तर प्रदेशातून ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश वासिंयांची माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. राज ठाकरे यांना आपण करीत असलेला विरोध ही आपली व्यक्तिगत बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या निषेधाच्या माझ्या पक्षाचा संबंध नाही. मी आधी रामाचा वंशज, मग उत्तर भारतीय आणि शेवटी भाजपचा सदस्य आहे, असं म्हणत सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याचा विरोध कायम ठेवला आहे. मुंबईतूनही आता भाजप राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध होतोय. तर अयोध्या दौऱ्याला विरोध करु नका असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज ठाकरेंना विरोध करण्याचे कारण मला समजलेले नाही .

रामाच्या चरणी ते जात असतील तर जाऊ द्या , असं मत त्यांनी नाशिकमध्ये व्यक्त केलं. ९५दुसरीकडे १० जूनला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱा करणार आहें. त्यांना काय साध्य करायचं हे अजून कोणालाच समजलेलं नाही.

मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या जागेचे भूमीपूजन करुन कार्याला सुरुवात केली. पण याच अयोध्या राम मंदिरावरुन राजकारण तापत आहे. प्रत्येकाला अयोध्या दौरा करुन नक्की काय साध्य करायचं आहे, हे पालिका निवडणुकांच्या दरम्यानच समजेल. भाजप, मविआ आणि मनसे सगळे जण या गंगेत हात धुऊन घेत आहेत. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, की पोळी नक्की कोण भाजणार आणि बाजी कोण मारणार , हे निवडणुकांच्या निकालानंतरच कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा