मुंबई, 8 जून 2022: 3 जून ही गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. या दिवशी पंकजा मुंडे यांनी एक विधान केले होते. मी जागेसाठी हट्ट करणार नाही. मात्र जर मला संधी मिळाली तर मात्र दिलेल्या संधीचे नक्की सोने करीन.
भाजपने पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा गंभीर विचार केलेला दिसत नाही. त्यामुळेच भाजपने विधानसभेसाठी जवळ जवळ पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचा पत्ता कट केलाय. प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारत्य, राम शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब जरी झाले नसले तरी त्यांचं नाव पुढं करण्यात आलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची या पर्यायाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या तोंडावर आता भाजपची विधानसभेची तयारी सुरु झाली आहे.
महाविकास आघाडी आता विधानसभेसाठी सहा जागा लढवणार असून सहावी जागा ही काँग्रेस लढवणार असून या जागेसाठीच्या उमेदवाराचे नाव अजून निश्चित झालं नाही. विधानसभा निवडणुकीतही घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही. पण आता हा निवडणुकीचा मोसम रंगणार आणि कोण रंग उधळणार हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस