महाविकास आघाडीत घड कमी मोड जास्त…

मुंबई 8 जून, 2022: राज्यसभा निवडणूक अवघ्या 48 तासांवर येऊन ठेवली असताना, महाविकास आघाडीने आपले शक्ती प्रदर्शन केलं. हॅाटेल ट्रायडंटमध्ये शरद पवार, जयंत पाटील , उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन झालं खरं, पण नंतर यातून मुख्यमंत्र्यांप्रती नाराजीच समोर आलीय.


आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने मुख्यमंत्र्यांनी उत्तर न दिल्याने आमदार देंवेंद्र भुयार नाराज आहे. मात्र आपले मत हे मविआलाच असेल, असं स्पष्ट करत त्यांनी आपलं मत जाहीर केलं. तर सपा उमेदवार अबु आझमी यांनी मुख्यमंत्र्यांबद्गल आपली नाराजी व्यक्त केली. राणा दांपत्य आज कोर्टात गैरहजर राहणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. तर त्यापेक्षा त्यांना मतदान करता येऊ नये, हा मुख्यमंत्र्यांचा हेतू असल्याचं राणा दांम्पत्यांनी सांगितलं.


एकुणातच मुख्यमंत्र्यांप्रती नाराजी व्यक्त होणं, हे महाविकास आघाडीसाठी नक्कीच धोकादायक आहे . त्यामुळं आता पुन्हा काय नवीन वळण या नाराजीला लागतं, हे निकालानंतर कळेल.


न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा