सफरचंद खाओ…खुद्द जाणं जावो

आपण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या फळांचे सेवन करतो.त्यापैकी सफरचंद एक आहे. आपल्याला माहीत आहेत का सफरचंद खाल्ल्याने काय होते. अनेकजण सफरचंद साल काढून खातात. परंतु सफरचंद नेहमी साली सकट खावे. रोज एक सफरचंद खाल्ल्यास आरोग्य एकदम ठणठणीत राहते. पण हेच सफरचंद जर सालीसकट खाल्ले तर अनेक आजार तुमच्या जवळदेखील फिरकणार नाहीत. एवढी जबरदस्त ताकद सफरचंदाच्या सालीत आहे. यात अनेक पोषक जीवनसत्त्व असतात. हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा तसेच त्वचेच्या समस्या दूर होतात. काही लोक मुतखडा होईल या गैरसमजातून सफरचंदाची साल खात नाहीत. चला तर मग जाणून घेऊया सफरचंद आणि त्याच्या सालीचे फायदे…

सालीचे फायदे:

* साल खाल्याने तल्लख बुद्धी विकारांपासून मेंदूचे संरक्षण होते. बुद्धी तल्लख होते. विचारशक्ती वाढते.

* फुफ्फुसे निरोगी राहून श्वसनाची समस्या तसेच फुफ्फुसाच्या समस्या दूर होतात.

* सफरचंदची साल खाल्याने दृष्टी सुधारते मोतीबिंदू होत नाही.

* सफरचंदाच्या सालीमध्ये लोह, फॉलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने अ‍ॅनिमिया रोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. रक्तवाढ होते.

* मधुमेहावर नियंत्रण याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रक्त शुद्धीकरणाची प्रक्रियादेखील होते.

* लठ्ठपणा कमी होतो. वजन कमी करण्यासाठी सफरचंद सालीसकट खावे. यामुळे चरबी कमी होते. यातील उर्सोलिक अ‍ॅसिडमुळे वजन कमी होते.

* हृदयरोग दूर होतात. सालीसह सफरचंद खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यातील फायबर्समुळे कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होतो.

*;यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास कमी होतो.

* कर्करोग शक्यता कमी असते. कारण यातील ट्रिटरपेनाइड्स तत्त्वांमुळे कर्करोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा