पुणे, १ ऑगस्ट २०२२: पुण्यात अति प्रमाणात पाऊस झाल्याने खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात सर्वपक्षांकडून भाजपला दोषी ठरवण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नांवर लक्ष घातलं आहे.
कोथरुड, कर्वेनगर आणि सिंहगड रोडदरम्यानच्या राजाराम पूलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर पूल उभारण्यात येणार आहे. या पूलाच्या कामाला गती द्या, अशा सुचना चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉ विक्रम कुमार यांना दीली आहे.
सिंहगड रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. एक किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी एक तास लागतो. अशी तक्रार नागरीकांनी केली होती. त्यामुळे या रस्त्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर