गुजरात, १९ऑक्टोबर२ ०२२: टेक महिंद्रा कंपणी गुजरातमध्ये पुढील पाच वर्षात तीन हजार नोकर भरती करणार आहेत. मंगळवारी कंपणीने ही घोषणा केली आहे.
टेक महिंद्रा ही कंपणी देशातील पाचव्या क्रमांकाची आयटी सेवा करणारी कंपणी आहे. कंपणीने मगंळवारी त्यांच्या आयटी धोरणांतर्गत गुजरात सरकारसोबत सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
या करारामुळे कंपणीला एंटरप्रायझेसच्या बदलत्या अभियांत्रिकी गरजा पुर्ण करता येतील, असे कंपणीचे व्यवस्थापकीय अधिकारी आणि संचालक सी पी गुरनानी यांनी सांगितले आहे. तसेच व्यवसाय सुधारणा केल्याबद्दल गुजरात राज्याचे कौतूक केले आहे.
एका अधिकृत निवेदनात कंपणीने असे सांगितले की सरकारने आतापर्यत IT/ITes धोरणांतर्गत देशांतर्गत आणि जागतिक कंपन्यांसोबत १५ सामंजस्य करार केले आहेत. ज्यामुळे राज्यात अंदाजे २६.७५० गरजूना आयटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर