अहमदाबाद, २९ ऑक्टोबर २०२२: गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, ‘मिशन २०२२’ साठी काँग्रेसबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शंकर सिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्र सिंह शंकर सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी महेंद्रसिंग वाघेला यांचे पक्षात स्वागत केले.
Former Gujarat CM Shankersinh Vaghela's son Mahendrasinh Vaghela joins Congress. pic.twitter.com/aUDJLQP4du
— ANI (@ANI) October 28, 2022
काय म्हणाले महेंद्रसिंह वाघेला ?
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वाघेला म्हणाले, मला द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध लढायचे आहे. मी भाजपमध्ये कधीही आरामात नव्हतो. मी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, गेल्या पाच वर्षांत मी कधीही पक्षासाठी काम केले नाही. कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. आता मी काँग्रेसमध्ये परतलो आहे आणि पक्षासाठी काम करणार आहे.
काँग्रेसकडून कोणतीही वचनबद्धता नव्हती किंवा त्यांनी कोणतीही मागणी केलेली नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पक्ष जे काही काम सोपवेल ते आनंदाने पार पाडू. यासोबतच त्यांनी दावा केला की, त्यांनी जवळपास २७ वर्षे काँग्रेस आणि पक्षाच्या नेत्यांसाठी काम केले आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्यासोबत चांगले काम करू.
दरम्यान, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बयाडचे आमदार महेंद्रसिंह वाघेला यांनी वडिलांसह कॉंग्रेस पक्ष सोडत भाजपा मध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा वाघेला यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.