भारतात गेल्या २४ तासांत २०१ कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली, २४ डिसेंबर २०२२ : भारतात गेल्या २४ तासांत २०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने शनिवारी (ता. २४) दिली. भारतातील सक्रिय रग्णसंख्या सध्या ३,३९७ आहे जे एकूण प्रकरणांपैकी ०.०१ टक्के आहे.

गेल्या २४ तासात एकूण १,०५,०४४ कोविड-१९ डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी कोविड-१९ लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २२०.०४ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरात कोविड-१९ लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड-१९ लसीकरण १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झाले. कोविड-१९ लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा २१ जून, २०२१ रोजी सुरू झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश लस पुरवठा साखळी सुव्यवस्थित करीत आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-१९ लस मोफत देऊन त्यांना मदत करीत आहे. कोविड- १९ लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या ७५ टक्के लसींची खरेदी आणि पुरवठा (विनामूल्य) करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा