नवी दिल्ली, ६ एप्रिल २०२३: केंद्र सरकारने सीआरपीएफ केंद्रीय राखीव पोलीस दलात गट क च्या प्रवर्गातील जनरल कॉन्स्टेबल या पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सामान्य कर्तव्य संवर्ग, गट सी पोस्ट, भर्ती नियम २०२३ अंतर्गत जारी केले आहे. एकूण १ लाख ३० हजार पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुषांसाठी आहे. तर ४६६७ पदे महिलांसाठी असणार आहेत.
या पदासाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत वयात पाच वर्षे सूट आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्षे) तर अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट असणार आहे. तर माजी अग्निवीरांच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांपर्यंत शिथिल असणार आहे.
भरतीसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या कॉन्स्टेबल साठी निर्धारित केलेली शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, आवेदन शुल्क यासंबंधीची माहिती लवकरच सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल. अशी माहिती गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर