बंगळूर, ११ एप्रिल २०२३: कर्नाटकमध्ये ‘अमूल’ दूध आणि दही विक्रीविरोधात शेतकरी संघटना, कन्नड संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही कारणास्तव अमूलच्या दूध-दही विक्रीला मुभा देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी लावून धरली आहे. म्हैसूर बँकेसमोर कन्नड संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे.
संघटनेचे नेते अंजनेय म्हणाले, अमूल संस्था कर्नाटकातल्या लोकांच्या भावनेशी खेळ खेळत आहे. कर्नाटकातल्या जनतेने केएमएफ दूध संस्थेची उभारणी केली आहे. तिला उतरती कळा लागू नये. केंद्र सरकारने नंदिनीचे विलीनीकरण अमूलमध्ये करण्याचा प्रस्ताव आखला आहे. तो चुकीचा आहे. त्याविरुद्ध तीव्र आंदोलन करु, असे भैय्या रेड्डी यांनी सांगितले आहे.
कर्नाटकात शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यामुळे दूध डेअरी क्षेत्राचे खासगीकरण केल्यास बाहेर देशात दूधापासून पाठवलेल्या पदार्थावर अमूलचेच नाव असेल म्हणून ‘अमूल’ विरोधात कन्नड संघटनांचे आंदोलन होणार. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमूलला संधी देऊ नये. अशी मागणी आंदोलन करणाऱ्या कन्नड संघटनांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर