राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधानांकडून उद्घाटन

दिल्ली, १२ एप्रिल २०२३ : राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला आज पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. याआधी जानेवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान भारताच्या आठव्या वंदे भारत एक्सप्रेसला आणि ८ एप्रिल रोजी चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस नंतर सिकंदराबाद रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारी सेमी-हाय-स्पीड क्लासमधील ही दुसरी रेल्वे होती.

तर आज उद्घाटन झालेली रेल्वे ही हाय राइज ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) क्षेत्रातील जगातील पहिली अर्ध-हाय स्पीड पॅसेंजर ट्रेन आहे असे म्हटले जात आहे. जयपूर आणि दिल्ली कॅंट रेल्वे स्थानकांदरम्यान या ट्रेनने उद्घाटनासाठी प्रवास केला. आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनचे उद्घाटन झाले असून १३ एप्रिल गुरुवार पासून ट्रेनचे नियमित धावेल.

राजस्थानमधील पर्यटन स्थळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने, वंदे भारत एक्सप्रेस अजमेर आणि दिल्ली कॅंट दरम्यान, जयपूर, अलवर आणि गुडगाव येथे स्टॉप्स घेऊन धावेल जे दिल्लीला पुष्कर आणि अजमेर शरीफ दर्गासह इतर प्रमुख पर्यटन स्थळांशी जोडले आहेत. रेल्वे अजमेर-दिल्ली कॅन्ट प्रवास ५ तास आणि १५ मिनिटांत पूर्ण करेल. दिल्ली कॅंट आणि अजमेर दरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला ६ तास १५ मिनिटे लागतात. त्यामुळे ही ट्रेन सध्याच्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वेने घेतलेल्या वेळेपेक्षा एक तास अगोदर पोहोचेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा