झारखंड मधे सुरु होणार एअर अॅम्ब्युलन्स सेवा

झारखंड, २८ एप्रिल २०२३: झारखंड सरकार शुक्रवार, २८ एप्रिलपासून रांची आणि इतर ६ केंद्रांवरून एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. या निर्णयामुळे विविध राज्यांतील उच्च वैद्यकीय केंद्रे जोडून गंभीर आजारांवर उपचार करणे आता शक्य होईल. एअर अॅम्ब्युलन्स सर्वांना योग्य किमतीत उपलब्ध करून दिली जाईल.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुकिंग झाल्यानंतर दोन तासांत रुग्णवाहिका तयार होईल आणि ती आपत्कालीन उपकरणे आणि डॉक्टरांनी सुसज्ज असेल. नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, वाराणसी, लखनौ आणि तिरुपती येथे या एअर अॅम्ब्युलन्स द्वारे सेवा पुरविली जाईल.

नागरी विमान वाहतूक संचालक (ऑपरेशन्स) कॅप्टन एस पी सिन्हा यांनी सांगितले की, “देशातील कोणत्याही राज्याने घेतलेला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हस्ते एअर अॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे”.

ही एअर अॅम्ब्युलन्स सेवा रांची, देवघर, दुमका, बोकारो, धनबाद, गिरिडीह आणि जमशेदपूर येथे उपलब्ध असेल. याचे सेवा शुल्क ३ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंत आहे. रांची ते कोलकाता ३ लाख रुपये तर रांची ते तिरुपती किंवा चेन्नई ८ लाख रुपये खर्च येईल. रांची ते दिल्ली दरम्यानची एअर अॅम्ब्युलन्स सेवा फक्त ५ लाख रुपयांत दिली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा