जे.जे.रुग्णालय चौकशी समितीचा अहवाल डॉ.तात्याराव लहानेंच्या विरोधात, डॉ.लहाने यांनी आरोप फेटाळले

मुंबई १७ जून २०२३: मुंबईतील जे.जे.रुग्णालयातील मानद प्राध्यापक डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख, यांच्याविरोधात निवासी डॉक्टरांच्या संघटनेने गंभीर आरोप व आंदोलन केले होते. त्यानंतर तात्याराव लहाने आणि डॉक्टर रागिनी पारेख यांच्यासह इतर सात ते आठ डॉक्टरांनी राजेनामे दिले.

लहाने यांच्यावरील गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी, सरकारकडून एक समिती नेमण्यात आलेली, आता त्यासमितीचा अहवाल आला असून या समितीने लहाने यांच्यावर विनापरवानगी शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक अहवाल दिला आहे. या चौकशी अहवालानुसार, सरकारची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना डॉ. लहाने यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या, असा ठपका ठेवण्यात आलाय.

डॉ.तात्याराव लहाने यांनी सरकारच्या मान्यतेशिवाय किंवा कुठलीही ऑर्डर नसताना, ६९८ शस्त्रक्रिया केल्या आहेत. जे.जे.रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी, डॉ. तात्याराव लहाने व नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.रागिणी पारेख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी, त्रिसदस्यीय समिती नेमली होती. ज्याचा अहवाल १२ जूनला आला. या अहवालातील बाबींनां व इतर आरोपांना डॉ.लहाने यांनी फेटाळून लावले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा