मुंबई १८ जून २०२३: मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर येथील लोकल बसस्थानकाला बांगलादेश असे नामकरण केल्याने खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक परिसरात महापालिकेने हा पराक्रम केला. बांगलादेशातील विस्थापित नागरिक येथे राहत असल्याने, पूर्वी या भागाला बांगलादेश हे टोपणनाव दिले होते. आता पालिकेने परिवहन बसस्थानकाला दिलेल्या या नावामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी पसरलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील मजूर पश्चिम बंगालमधुन मोठ्या संख्येने आले होते. मासेमारीसाठी मजुरांची आवश्यकता होती. ही वसाहत भाईंदरच्या पाली चौकात होती. त्यांची भाषा बांगला असल्याने हे ठिकाण बांगलादेश वस्ती म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ही बोली लोकप्रिय झाली.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने पूर्व बंगालला स्वातंत्र्य मिळाले आणि १९७१ मध्ये ‘बांगलादेश’ नावाचा नवा देश निर्माण झाला तेंव्हा या कॉलनीचे नाव इंदिरा नगर करण्यात आले. येथील नागरिकांच्या आधारकार्ड, लाईट बील आणि महापालिकेच्या घरांवर ‘बांगलादेश’ हे नाव असायचे आणि सर्वात मोठी बाब म्हणजे मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
येथील नागरिकांमध्ये याप्रकरणी तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन नाव बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी सुरू केलीय. स्थानिक रहिवासी धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, ते गेल्या २५ वर्षांपासून या भागात राहतात. अनेक दिवसांपासून या भागाचे नाव बांगलादेश ठेवले जात आहे, पण ते योग्य नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड