ट्विटर कडून TweetDeck चं नवं वर्जन लॉन्च; पण वापर करण्यासाठी ब्लू टिक अनिर्वाय

पुणे, ४ जुलै २०२३: ट्विटर अधिकृतपणे प्रत्येकासाठी ‘ट्वीटडेक’ ची नवीन आवृत्ती लाँच करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ट्वीटडेक वापरताना युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत होता, या समस्या कमी करण्यासाठी ट्वीटडेकचं हे नवं वर्जन मदत करणार आहे. ट्वीटडेक ची नवी आवृत्ती ३० दिवसात एक वैशिष्ट्यपूर्ण वापरकर्ता बनेल. पण याचाच दुसरा अर्थ म्हणजे यासाठी वापरकर्त्यांना ब्लु टिक अनिवार्य असून, ट्विटर ब्लूच्या सदस्यत्वासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

ट्वीटडेक पूर्वी वापरकर्त्यांसाठी विनामूल्य होते. ते व्यवसाय आणि बातम्या संस्थांद्वारे सामग्रीचे परीक्षण करण्यासाठी वापरले जाते, पण आता ते चार्जेबल झाल्यामुळे ट्विटरच्या कमाईत वाढ होऊ शकते. ट्वीटडेक आता व्हिडिओ डॉकिंग, पोल्स (मतदान) आणि संगीत कार्यक्षमतेतून सेवा देईल. सध्या, ट्वीटडेक चे कार्य तात्पुरते अनुपलब्ध आहे, ते लवकरच ३० दिवसात कार्यान्वित केले जाईल, पण ते वापरण्यासाठी वापरकर्त्यांकडे व्हेरिफाईड अकाउंट असणे आवश्यक आहे.

डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. एलॉन मस्क म्हणाले, डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनची पातळी दर्शविण्यासाठी अकाउंट धारक मर्यादित संख्येने पोस्ट वाचण्यास सक्षम असतील. म्हणजे व्हेरिफाईड अकाऊंट यांना आता दररोज ६००० पोस्ट्स वाचता येणार आहे. तर अनव्हेरिफाईड अकाऊंट यांना रोज ६०० पोस्ट्स वाचता येतील. तर नव्यानं ज्यांनी अकाऊंट उघडले आहेत, असे नवीन व्हेरिफाईड अकाउंट्स रोज फक्त ३०० पोस्ट वाचू शकतील.

ट्विटर वापरकर्त्यांनी आणि जाहिरात तज्ञांनी एलॉन मस्क यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, TweetDeck च्या नव्या व्हर्जनचा परिणाम नवीन सीईओ लिंडा याक्करिनो यांच्यावर होईल, ज्यांनी गेल्या महिन्यात या पदावर ट्विटर मध्ये सुरुवात केलीय. वापरकर्त्यांना त्यांचे खाते सत्यापित करण्यासाठी दरमहा ८ डॉलर्स (अंदाजे ६५५ रुपये) द्यावे लागणार आहेत. तर कंपन्या किंवा संस्थांना दरमहा १ हजार डॉलर्स (अंदाजे ८१,८९७ रुपये) शुल्क द्यावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा