नवी दिल्ली, ५ जुलै २०२३ : मंगळवारी जाहीर झालेल्या नवीन महिला एकेरी BWF जागतिक क्रमवारीत, दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू ३ स्थानांनी घसरून आता १५ व्या स्थानावर पोहोचली आहे. सिंधूने या मोसमात एकही स्पर्धा जिंकलेली नाही. ती यंदाच्या अपीलमध्ये एलिट टॉप १० मधून बाहेर पडली होती.
दुखापतीमुळे सिंधूचा फॉर्म खराब झाला असे बोलले जातंय. या मोसमातील सिंधूची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे माद्रिद स्पेन मास्टर्स सुपर ३०० ची अंतिम फेरी आणि मलेशिया मास्टर्स सुपर ५०० ची उपांत्य फेरी. सिंधू या आठवड्यात कॅनडा ओपन सुपर ५०० मध्ये खेळणार आहे, कारण तिला कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर घोट्याला फ्रॅक्चर झाला होता. आता पाच महिन्यांच्या दुखापतीनंतर सिंधूने पुनरागमन केलय.
एकूण तेरा स्पर्धेत सिंधूचे आता ५१०७० गुण आहेत. जपानची ‘अकाने यामागुची’ महिला एकेरीत १०३७१७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक जिंकल्यावर १३००० पर्यंत पॉइंट्स मिळतात. जास्त गुण असणारे टॉपवर असतात. विजेत्यांव्यतिरिक्त, अंतिम फेरीतील, उपांत्य फेरीतील खेळाडूंपासून स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना देखील त्यांच्या श्रेणी आणि स्थानांनुसार गुण दिले जातात. एकूण गुणांच्या आधारे जागतिक क्रमवारी ठरवली जाते. भारताचे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे जगातील अव्वल क्रमांकाचे पुरुष दुहेरीचे खेळाडू आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे