पहिली मेड-इन-इंडिया ‘हार्ले-डेव्हिडसन X440’ बाईक भारतात लॉन्च

नवी दिल्ली, ५ जुलै २०२३ : ‘हार्ले-डेव्हिडसन X440’ ही एंट्री-लेव्हल बाइक हार्ले-डेव्हिडसन कंपनीची सर्वात स्वस्त आणि परवडणारी रोडस्टर क्रूझर बाइक आहे. ‘हार्ले-डेव्हिडसन X440’ ही नुकतीच अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली असुन ही हार्ले-डेव्हिडसनची पहिली मेड-इन-इंडिया बाईक आहे. भारतात रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०, होंडा CB ३५० आणि CB ३५० RS, Benelli Imperiale ४०० आणि आगामी Triumph Speed ​​४०० शी देखील हार्ले-डेव्हिडसन X440 ची स्पर्धा असेल.

कंपनीने ही बाइक तीन व्हेरिएंटमध्ये सादर केलीय. व्हेरिएंटकिंमत ही पॅन इंडिया एक्स-शोरूम प्रमाणे आहे. डेनिम ₹२.२९ लाख, विविड ₹२.४९ लाख, एस ₹२.६९ लाख. नवीन हार्ले-डेव्हिडसन X440 च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात स्क्वेरिश इंधन टाकी, LED DRL सह गोल हेडलाइट, हेडलाइटच्या वर गोल स्पीडो मीटर, इंडिकेटर आणि मिररसह रुंद हँडलबार मिळतो. हेडलाइटला रिंग-आकाराचा LED प्रोजेक्टर मिळतो ज्यावर हार्ले-डेव्हिडसन लिहिलेले आहे.
अजून यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह ड्युअल-चॅनल ABS (समोर आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक) आहे. हे प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल ट्विन शॉक अॅब्जॉर्बरसह येते. यासह, पुढील चाक १८ इंच आणि मागील चाक १७ इंच आहे. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह नेव्हिगेशन, कॉल आणि मेसेज मॅनेजमेंटसाठी TFT युनिट मिळते. याशिवाय यूएसबी चार्जिंग सॉकेटही देण्यात आले आहे.

​​​​​​​कंपनीने हार्ले-डेव्हिडसन X440 मध्ये 440CC ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे, जे ६-स्पीड गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. हे इंजिन २७ bhp पॉवर आणि ३८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन E२० पेट्रोलनुसार बनवले आहे. ही बाईक राजस्थानच्या नीमराना येथे बनली जाणारेय. त्यानंतर तिची जगभरात निर्यात होईल. हिरो मोटोकॉर्पच्या साहाय्याने ही बाईक हार्ले-डेव्हिडसनने विकसित केली आहे. दोन्ही कंपन्यांनी घोषणा केली की, ही बाईक भारतात हिरोच्या डीलरशिपद्वारे विकली जाईल.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा